ऑनलाईन टीम / रांची :
मध्यप्रदेशात सहा ऑक्सिजन टँकर घेऊन येणारी एक्सप्रेस झारखंडमधील बोकारोहून आज सकाळी रवाना झाली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली.
चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्यप्रदेशात ऑक्सिजन पुरवठा सातत्याने सुरूच आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस आज सकाळी 6 वाजता बोकारोहून निघाली आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून मध्यप्रदेशात सहा ऑक्सिजन टँकर येणार आहेत. आज (मंगळवारी) रात्री दोन टँकर जबलपूरला पोहोचतील आणि उद्या सकाळी 4 टँकर मंडीदीप (भोपाळजवळ) येथे पोहोचतील.