ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील शहडोल आणि अनुपपूरमध्ये आज दुपारी 12.53 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल एवढी होती. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजीने ही माहिती दिली आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू छत्तीसगडच्या विलासपूरपासून जवळपास 139 किलोमीटर अंतरावर शहडोलजवळ जमीनीखाली 10 किलोमीटर आत होता. अनुपपूर जिल्ह्यातील जतहरी, वेंकटनगर, अमलाई, बिजुरीसह ग्रामीण भागातही भूकंपाचे धक्के जाणवले.