ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार देवेंद्र पटेल यांच्यानंतर आता माजी आमदार भगवान सिंह यांनाही धमकीचे पत्र आले आहे.
देवेंद्र पटेल यांना 29 जानेवारीला धमकीचे पत्र मिळाले. या पत्राच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली, पैसे न मिळाल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. पटेल यांच्या बरेली येथील निवासस्थानी हे धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर पटेल यांनी 5 फेब्रुवारीला बरेली पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली. त्यानंतर 10-12 दिवस उलटून गेल्यानंतर आता भगवान सिंह यांनाही अशाच प्रकारचे धमकीचे पत्र आले असल्याचे पटेल यांनी सांगितले. बरेली पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.