ऑनलाईन टीम / भोपाळ :
बिहारबरोबरच आज मध्यप्रदेशात 28 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. आतापर्यंतच्या कलांनुसार 28 जागांपैकी भाजपने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस 8 आठ तर बसपा एका जागेवर आघाडीवर आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या 22 समर्थक आमदारांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्याने मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यांनतर मुख्यमंत्रीपदी शिवराज सिंह चौहान विराजमान झाले. काँग्रेस आमदारांच्या पक्षांतरामुळे गेलेली आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी 19 जिल्ह्यातील 28 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत.
मध्यप्रदेशच्या 230 सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे 107 तर काँग्रेसचे 87, बसपा 2, सपा 1 आणि 4 अपक्ष आमदार आहेत. 115 हा बहुमताचा एकडा ठरू शकतो. भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी 8 जागा जिंकणे आवश्यक आहे. तर काँग्रेसला 28 जागांची आवश्यकता आहे.