भोपाळ
मध्यप्रदेशातील शिवपुरी पोहरीजवळ एक पिकअप व्हॅन उलटून झालेल्या अपघातात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन दिवाळी सणात झालेल्या या भीषण अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त पिकअप व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दिवाळीनिमित्त घरी परतणाऱया मजुरांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
शिवपुरी जिल्हय़ातील पोहरीहून एक पिकअप व्हॅन प्रवाशांना घेऊन विजयपूरकडे निघाली होती. पोहरीहून गाडी सुमारे 7 किलोमीटर पुढे आली होती. त्यानंतर अचानक एका वळणार व्हॅन उलटली. अपघातातील जखमींना पोहरीतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
…….