ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशातील सिधीहून सतनाच्या दिशेने निघालेली प्रवासी बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 30 फूट खोल कालव्यात कोसळली. या बसमधून 54 प्रवाशी प्रवास करत होते. बस पाण्यात पूर्णपणे बुडाली असून, 7 प्रवासी पोहत बाहेर आले. तर चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
क्रेनच्या सहाय्याने बस पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कालव्यात पाणी जास्त असल्याने बाणसागर धरणातून होणारा पाण्याचा प्रवाह रोखण्यात आला आहे.