ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्य प्रदेशातील अंगणवाडीमध्ये मुलांना पौष्टिक आहारात अंडे देण्यावरून निर्माण झालेला वाद शांत करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान पुढे आले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडीतील मुलांना आता अंड्याऐवजी दुधाचा आहार दिला जाणार आहे.
मध्य प्रदेशातील महिला आणि बाल विकास मंत्री इमरती देवी यांच्याकडून अंगणवाडीच्या मुलांना पौष्टिक आहार म्हणून अंडे देण्यात यावे यासाठी आदेश दिला होता. पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सांगितले की, कुपोषण मुक्तीसाठी अंगणवाडी केंद्रात अंडे नाही तर आता दूध दिले जाणार आहे आणि याची सुरुवात 17 सप्टेंबर पासून करण्यात येणार आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशात 16 ते 26 सप्टेंबर या काळात गरीब कल्याण सप्ताह साजरा केला जात आहे. या अंतर्गत मुख्यमंत्री शिवराज सिंह 17 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील चिन्हांकित नवनिर्मित 601 अंगणवाडी भवनांचे डिजिटल पद्धतीने लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर अंगणवाडी केंद्रातील कुपोषित बालकांना दूध वाटले जाणार आहे.