ऑनलाईन टीम / सतना :
मध्यप्रदेश मधील सतना जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी एक मोठा अपघात झाला. जिल्ह्यातील नागौद भागात एक बलेरो आणि डंपरची टक्कर झाली. ही टक्कर एवढी मोठी होती की, यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना रीवा मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृत व्यक्तींमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे.
रीवा मधील विश्वकर्मा परिवार पन्नामध्ये एका शोक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथून हे पूर्ण कुटुंब बोलेरो मधून घरी येत असताना नागौद भागात एका वळणावर अचानक समोरून डंपर आल्याने गाडीवरील नियंत्रण जावून हा अपघात झाला. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत.
दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींबद्दल शोक व्यक्त केला तर जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली.