ऑनलाईन टीम / भोपाळ :
कोरोनावर मात करण्यासाठी भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आलेली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. तर, लसीवरून राजकीय वादंग देखील सुरू झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेसच्या नेत्यांकडून कोव्हॅक्सिनबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असे असताना आता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज शिवराजसिंह चौहान सिंह चौहान यांनी देखील लस संदर्भात एक निर्णय जाहीर केला आहे.
सोमवारी बोलताना ते म्हणाले, आताच लस टोचवून घेणार नाही, यामागचे नेमके काय कारण आहे? हे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
ते म्हणाले, लसीकरणासंदर्भात बोलायचे झाले मध्यप्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोविड 19 ची तयारी सर्व ठिकाणी झालेली आहे. पण मी असा निर्णय घेतला आहे की मी आताच लस टोचवून घेणार नाही. अगोदर बाकीच्यांना लस दिली गेली पाहिजे, त्यानंतर आपला क्रमांक यावा. प्रायॉरिटी ग्रुप्सच्या लसीकरणास अगोदर प्राधान्य दिले जाईल, त्यानंतर माझे लसीकरण होईल, असे शिवराजसिंह चौहान यांनी यावेळी स्पष्ट केले.