ऑनलाईन टीम / भोपाळ :
खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांविरोधात मध्यप्रदेश सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी शिवराजसिंह चौहान सरकारच्या मंत्रिमंडळाने दंड कायदा विधेयक 2021 ला मंजुरी दिल्याचे राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
मिश्रा म्हणाले, मध्यप्रदेशच्या मंत्रिमंडळाने आता खाद्यपदार्थात भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली आहे. अशा प्रकारच्या व्यक्तींना जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी दंड कायदा विधेयक 2021 ला मंजुरी देण्यात आली आहे. खाद्यपदार्थातील भेसळीमुळे उदभवणारे धोके लक्षात घेता शिवराजसिंह सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.