ऑनलाईन टीम / मुंबई :
मध्यप्रदेशातील भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास सारंग यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले.
स्व. पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या टीममध्ये काम करणारे कैलास सारंग यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना सप्टेंबरमध्ये भोपाळमधील बन्सल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने एअर ॲम्बुलन्सने मुंबईत आणले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला .