काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच धरणे
प्रतिनिधी / बेळगाव
मराठी भाषिकांनी आजपर्यंत नेहमीच लोकशाहीच्या माध्यमातून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबरोबरच दडपशाही विरोधात आंदोलन केले आहे. अनेक वर्षे अन्यायाविरोधात लढत असताना दडपशाही झुगारुन आंदोलने केली आहेत. यावषीही अशाच प्रकारे आवाज दडपण्यात येण्याची शक्यता आहे. तरी देखील कोरोनाचे नियम पाळत कायद्याच्या चौकटीतच सर्वांनी आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे 1 नोव्हेंबर रोजी मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मराठा मंदिर येथील खुल्या जागेत सकाळी 10.30 ते दुपारी 2 पर्यंत धरणे धरले जाणार आहेत. त्यामधून समस्त जनतेच्या भावना व्यक्त करण्यात येणार आहेत. मात्र याठिकाणी अधिक कार्यकर्त्यांनी न येता गर्दी टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक वॉर्डामध्ये मर्यादित वेळेत नियम पाळून निषेध नोंदवा. संवेदनशील भागामध्ये कोणत्याही व्यवहारात अडथळा आणू नये याची दक्षताही घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करुनच निषेध नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.