ऑनलाईन टीम / भोपाळ :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता शिवराज सिंह चौहान सरकारमधील कॅबिनेट मंत्री अरविंद भदौरिया यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अरविंद भदौरिया बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सहभागी झाले होते. तसेच ते राज्यपाल लालजी टंडन यांच्या अंत्य विधी कार्यक्रमात सहभागी झाले होते. सध्या त्यांना भोपाळ मधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतेही लक्षणे नाही आहेत, परंतु त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने क्वारंटाइन होण्यास सांगितले आहे. दरम्यान, लवकरच सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.