रेल्वे विभागाचा अजब प्रकार, पॅसेजर रेल्वे होण्याचा मार्ग खडतर
बेळगाव / प्रतिनिधी
लॉकडाऊनपूर्वी धावणाऱया वास्को- बेळगाव या पॅसेंजर व्यतिरीक्त इतर सर्व बेळगाववरून धावणाऱया पॅसेंजर या मध्यरेल्वेच्या पुणे विभागाच्या आहेत. या रेल्वे मिरजपासून हुबळी – कॅसलरॉक पर्यंत कर्नाटकात धावत असल्या तरी त्या मध्यरेल्वेने सुरू केल्या आहेत. यामुळेच पॅसेंजर सुरू करण्यास विलंब होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
9 महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यासाठी पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नैऋत्य रेल्वेची हद्द मिरज पासून अवघ्या काही अंतरावर असणाऱया विजयनगर रेल्वेस्थानकापर्यंत आहे. परंतु हुबळी पर्यंत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या पॅसेंजर रेल्वे धावतात. यामुळे पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे नैऋत्य रेल्वेने हुबळी ते मिरज या मार्गावर पॅसेंजर सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
पॅसेंजर सुरू होण्याचा मार्ग खडतर
लॉकडाऊन पर्यंत बेळगावमधून 6 ते 7 रेल्वे धावत होत्या. त्यापैकी 5 पॅसेंजर या मध्य रेल्वेच्या आहेत. तर सकाळची बंद करण्यात आलेली हुबळी व वास्को या दोन रेल्वे नैऋत्य रेल्वेन सुरू होत्या. पॅसेंजर सुरू झाल्यातरी त्याचा महसूल मध्य रेल्वेकडे जमा होणार असल्याने नेऋत्य रेल्वे पॅसेंजर सुरू करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
चूकीच्या वेळापत्रकामुळे बंद पडली वास्को पॅसेंजर
बेळगाव व गोव्याचा घनि÷ संबंध आहे. सांस्कृतिक, पर्यटन व व्यापारीदृष्टय़ा ही शहरे एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे बेळगाव ते गोवा या दरम्यान पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी मान्य करीत वास्को ते बेळगाव ही पॅसेंजर सुरू करण्यात आली. परंतु ती चूकीच्या वेळेत धावत असल्याने त्या पॅसेंजर रेल्वेला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लॉकडाऊनपूर्वी ती बंद करण्यात आली
लॉकडाऊनपूर्वी बेळगावमधून धावत असलेल्या पॅसेंजर
1) बेळगाव – मिरज पॅसेंजर वेळ स. 6 वा.
2) कॅसलरॉक – मिरज पॅसेंजर वेळ स. 7.45 वा.
3) लोंढा – मिरज पॅसेंजर वेळ दु. 12.45 वा.
4) बेळगाव – मिरज पॅसेंजर वेळ दु. 2.30 वा.
5) हुबळी – मिरज पॅसेंजर वेळ दु. 4 वा.