वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता मुष्टीयोद्धा 27 वर्षीय मनदीप जांगराने आपल्या व्यवसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रातील पदार्पणातच पहिली लढत जिंकली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आयोजलेल्या मुष्टीयुद्ध लढतीत मनदीपने अर्जेंटिनाच्या रॅमोसचा पराभव केला.
दोन महिन्यापूर्वीच मनदीप जांगराने प्रशिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण केले होते. शनिवारी फ्लोरिडामध्ये मनदीप जांगरा आणि अर्जेंटिनाचा रॅमोस यांच्यात ही लढत चार फेऱयाची आयोजित केली होती. या लढतीमध्ये मनदीप जांगराने रॅमोसवर विजय मिळविला. फ्लोरिडातील प्रो बॉक्स प्रमोशन बरोबर जांगराने यापूर्वीच करार केला आहे.