राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार आज बेळगावात : लोकसभा पोटनिवडणूक तयारीचा आढावा घेणार
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणुकीबाबत अद्याप कोणताच निर्णय झाला नाही. मात्र लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याच्या दृष्टीने शासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदान केंद्रांची पाहणी करण्यात येत असून, मंगळवार दि. 9 रोजी निवडणुकीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार बेळगाव भेटीवर येत आहेत.
मतदार याद्या तयार करणे, नवीन नावे दाखल करणे, मयत मतदारांची नावे कमी करणे अशी सर्व प्रक्रिया यापूर्वी पूर्ण करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने निवडणूक विभागाचे कामकाज सुरू असल्याची चर्चा होती. मात्र, महापालिका निवडणुकीबाबत अद्याप शासनाकडून कोणताच निर्णय जाहीर करण्यात आला नाही. आरक्षण आणि वॉर्ड पुनर्रचना वादाच्या भोवऱयात सापडल्याने महापालिका निवडणूक लवकर होण्याची चिन्हे धूसर बनली आहेत. मात्र, खासदारपद रिक्त असल्याने पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्यक तयारी निवडणूक विभागाने चालविली आहे.
पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी?
लोकसभा सदस्य मयत झाल्यास सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेऊन नवीन सदस्याची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. त्यामुळे खासदारपदाची निवडणूक घेण्यासाठी घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्मयता असल्याने आवश्यक तयारी करण्यात येत आहे.
यापूर्वी मतदार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मतदान केंद्रांची चाचपणी करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार महापालिकेचे महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. विविध मतदान केंद्रांवर पाहणी करून दिव्यांची सुविधा, खिडक्मया, दरवाजे व्यवस्थित आहेत का? अपंगांसाठी रॅम्प व अन्य सुविधांची माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात आला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजीवकुमार हे मंगळवार दि. 9 रोजी बेळगाव दौऱयावर येत आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निवडणूक विभागाच्या तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिकेसह निवडणूक विभागाच्या अधिकाऱयांनी तयारी चालविली आहे.