प्रतिनिधी /बेळगाव
शहरात स्वच्छतेचे काम करणाऱया कामगारांना विविध सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. सध्या पावसाला सुरूवात झाली असल्याने आरोग्याची काळजी घेण्यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याने स्वच्छता कामगारांना रेनकोट वितरीत करण्यात आले. सर्व वॉर्डमधील कामगारांना टप्याटप्याने रेनकोट वितरण सुरू करण्यात आले आहे.
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना कनिष्ट वेतन आणि आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य चिकित्सा करणे, हातमोजे,गमबुट उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. पावसात भिजून कचरा जमा करण्याचे काम स्वच्छता कामगार करीत असतात. त्यामुळे त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रेनकोट वितरित करण्यात आले.