प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेने शहरातील कचऱयाची उचल करण्यासाठी बॅटरीवर चालणाऱया दोन ई-ऑटोटिप्पर खरेदी केल्या आहेत. इतर भागातील कचऱयाची उचल करण्यासाठी आणखीन सहा ई- ऑटोटिप्पर खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच आणखीन 35 कचरावाहू वाहने खरेदी करण्यात आली असून, लवकरच मनपाच्या ताब्यात दाखल होणार आहेत.
शहर आणि उपनगरात घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येते. यापूर्वी भाडेतत्वावर रिक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र महापालिकेने ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी लहान आकाराची वाहने खरेदी केली आहेत. यापूर्वी 11 वाहने खरेदी केली होती. प्रत्येक वॉर्डकरीता एक टिप्पर या प्रमाणे सर्व वॉर्डसाठी वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आणखीन 35 वाहने खरेदी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा काढल्या होत्या. सदर वाहने तयार झाली असून, लवकरच वाहनताफ्यात दाखल होणार आहेत.
सदर वाहने लहान आकाराची असल्याने गल्लोगल्ली जाऊन कचरा जमा करण्यास कोणतीच अडचण येत नाही. तसेच ओला आणि सुका कचरा जमा करण्यासाठी गाडीच्या मागील बाजूस दोन वेगवेगळे कप्पे करण्यात आले आहेत. व त्या कप्प्याना पिवळा आणि हिरवा रंग देण्यात आला आहे. नव्याने खरेदी करण्यात आलेली 35 वाहने सज्ज झाली असून, सेवेत दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे इंधन बचत आणि प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेने बॅटरीवर चालणारी ई-रिक्षा खरेदी केली आहे. प्रायोगिक तत्वावर दोन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. तर उपनगरात आणि अरूंद गल्ल्यांमध्ये जाऊन कचरा जमा करण्यासाठी ई-रिक्षा सोयिची आहे. त्यामुळे आणखीन सहा ऑटोटीप्पर खरेदी करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. याकरिता निविदा प्रक्रिया मागविण्यात येणार आहे.