प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून दररोज हजाराच्या संख्येने बाधितांचा आकडा वाढत आहे. महापालिका कार्यालयातदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून 48 कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याने मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे. लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या बहुतांश कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील वषी कोरोना नियंत्रणासाठी मनपाचे कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत होते. पण काही ठराविक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, यंदा महापालिकेच्या कर्मचाऱयांवर मागील वषीप्रमाणे क्वारंटाईन करणे, कोरोना बाधितांचा शोध घेणे अशा जबाबदाऱया सोपविण्यात आल्या नाहीत. लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक कामात गुंतलेल्या प्रारंभी 25 कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली होती. काही कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सध्या हा आकडा वाढला असून महसूल, आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागासह विविध विभागातील कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे सध्या 48 हून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.
परिणामी सर्व कर्मचारी घरी उपचार घेत आहेत. काही कर्मचाऱयांची प्रकृती गंभीर झाल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काही कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
मागील वषीच्या तुलनेत यंदा मनपातील कोरोनाबाधित कर्मचाऱयांचा आकडा वाढला असल्याने भीती निर्माण झाली आहे. कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याने मनपाचे कामकाज ठप्प झाले आहे.