विभागीय कार्यालयांना अचानक भेटी दिल्याने कर्मचाऱयांची धावपळ : मुख्य अधिकाऱयांना केल्या विविध सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील कर्मचारी वेळेवर भेटत नसल्याच्या तक्रारी नेहमी होत असतात. त्यामुळे सामान्य प्रशासन उपायुक्तांनी बुधवारी मनपाच्या विभागीय कार्यालयांना अचानक भेट दिली. कार्यालयीन काम असल्याचे सांगून कार्यालयात अनुपस्थित राहणाऱया कर्मचाऱयांची हजेरी घेतली. त्यामुळे कर्मचाऱयांची धावपळ उडाली. कामानिमित्त बाहेर फिरणाऱया अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी मुव्हमेंट रजिस्टर ठेवण्याची सूचना केली आहे.
महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये कामकाज चालते. नागरिकांना सोयीचे व्हावे या उद्देशाने गोवावेस, अशोकनगर, विश्वेश्वरय्यानगर आणि महानगरपालिकेच्या जुन्या कार्यालयात विभागीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. विविध वॉर्डांतील कामे पाहणे, घरपट्टी चलन देणे व इतर तक्रारींची दखल घेण्यासाठी ही कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे कामकाज या ठिकाणी चालते. त्यामुळे नागरिकांची वर्दळ नेहमीच असते. घरपट्टी चलन देणे, घरपट्टीसंदर्भात अन्य कामे आणि खाते बदल करणे आदींसह विविध कामकाजांची जबाबदारी विभागीय कार्यालयातील अधिकाऱयांवर व कर्मचाऱयांवर सोपविली आहे. मात्र, संबंधित कार्यालयांमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नसल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. कार्यालयीन काम असल्याचे सांगून बहुतांश कर्मचारी बाहेर फिरत असतात. नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल वेळेवर घेतली जात नाही. त्यामुळे कर्मचाऱयांची उपस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे सामान्य प्रशासन उपायुक्त एस. बी. घंटी यांनी विभागीय कार्यालयांना बुधवारी सकाळी अचानक भेट दिली. त्यावेळी काही अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याने उपस्थित अधिकाऱयांची एकच धावपळ उडाली.
उपायुक्तांनी अचानक भेट देऊन कर्मचाऱयांची हजेरी घेतली. काही कर्मचारी रजेचा अर्ज न देताच परस्पर सुटीवर असल्याचे दिसून आले. हजेरी वहीवर काही अधिकाऱयांच्या व कर्मचाऱयांच्या सहय़ा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अनुपस्थित अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना गैरहजर घालण्याची सूचना केली. हजेरी वही मुख्य कार्यालयात देऊन चाचपणी करण्याची सूचना करण्यात आली. त्याचप्रमाणे कोणत्याही कर्मचाऱयाने सुटी घेतल्यास प्रथम रजेचा अर्ज भरून मुख्य कार्यालयात पाठवावा, अशी सूचना विभागीय कार्यालयातील मुख्य अधिकाऱयांना बजावली. गैरहजर राहणाऱया किंवा उशिरा येणाऱया कर्मचाऱयांची हजेरी घेऊन त्यांना गैरहजर घालण्याची सूचना केली. प्रत्येक विभागीय कार्यालात भेट देऊन मुख्य अधिकाऱयांना विविध सूचना केल्या. यावेळी महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे व्यवस्थापक बाळकृष्ण पिसाळे व इतर अधिकारी उपस्थित होते.