बेळगाव : महापालिका नोकर संघटनेच्या वतीने मैत्रीपूर्ण क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱयांच्या 10 संघानी स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत विशाल उच्चूकर संघाने प्रथम बाजी मारली. नोकर संघटनेचे अध्यक्ष मल्लीकार्जुन गुंडप्पण्णावर यांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना बक्षिस देण्यात आले. महापालिकेतील कर्मचाऱयांसाठी दरवषी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. मात्र मागील दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अशा स्पर्धा झाल्या नाहीत. शनिवार व रविवारी दोन दिवस सीपीएड मैदानावर स्पर्धां पार पाडल्या. यावेळी सर्व विभागाच्या वतीने संघ तयार करण्यात आले होते. एकूण 10 संघांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विशाल उच्चूकर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक आनंद पिंपरे यांच्या संघाने मिळविला. यावेळी बेस्ट प्लेअर म्हणून आनंद पिंपरे व बेस्ट बॉलर म्हणून रमेश हिरेमठ यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुंडपण्णावर, उपाध्यक्ष भरत तळवार व महेश नाईक आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleराहुल मगदुमची कोडगू एफसी संघात निवड
Next Article आयुषी, मोनिष विजेते, यशस्विनी घोरपडेला दुहेरी मुकूट
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.