कर्मचाऱयांसह आता कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होत असल्याची बाब निदर्शनास
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांना कोरोना नियंत्रणाच्या कामाकरिता जुंपण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांना कोरोनाची लागण होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र कर्मचाऱयांसह आता कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. मनपा कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कर्मचाऱयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
शहरात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊन काळात विविध कार्यालयांतील कर्मचाऱयांना सुटी देण्यात आली होती. मात्र पोलीस, आरोग्य, जिल्हा प्रशासन आणि महापालिका कार्यालयातील कर्मचाऱयांवर विविध जबाबदाऱया सोपविण्यात आल्या होत्या. कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करणे, परराज्यांमधून येणाऱया नागरिकांना क्वारंटाईन करणे आदांसह सॅनिटायझर करणे अशी कामे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली होती.
कोगनोळी नाका, सीपीएड मैदानात विशेष कक्ष स्थापन करून जबाबदाऱया सोपविण्यात आल्या होत्या. होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांवर नजर ठेवण्याची जबाबदारीही मनपाच्या कर्मचाऱयांवर सोपविली होती. त्यामुळे मनपा कार्यालयातील काही कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. या कार्यालयातील चार कर्मचाऱयांना लागण झाली असून उपचारांती ते कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र कोरोनाची लागण झालेल्या एका स्वच्छता कर्मचारी महिलेचा तसेच मनपाच्या स्वच्छता कंत्राटदाराचा मृत्यू झाला आहे. मनपा कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या अधिकाऱयाला कोरोनाची लागण झाली आहे. आवश्यक खबरदारी घेऊनही मनपा कर्मचाऱयांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही लागण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
क्वारंटाईन करण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली होती. पण ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना कोरोनाचा त्रास जाणवला नाही. मात्र, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेत नागरिकांची ये-जा कमी झाली आहे. पण विविध कामांच्या जबाबदारीमुळे मनपाच्या कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
मनपाच्या आश्रय विभागात काम करणाऱया कर्मचाऱयाची नियुक्ती कोगनोळी नाक्मयावर केली होती. त्या कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली. त्याच्या आई व भावालाही कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांवर क्वारंटाईन करण्याची जबाबदारी दिली होती. कर्मचाऱयाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मनपाच्या कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.