स्मशानभूमीतील कर्मचाऱयांसह कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत कर्मचाऱयांना पीपीई किट मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्या कर्मचाऱयांना पीपीई किटविना काम करावे लागत होते. त्यामुळे धोका पत्करून सेवा बजावावी लागत होती. निवडणूक कालावधीत 25 हून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पीपीई किट उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिकेने पीपीई किट खरेदी केले आहेत.
महापालिकेच्या कर्मचाऱयांना सुरक्षेच्यादृष्टीने केवळ हॅन्डग्लोव्ज, फेसशिल्ड, मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले होते. वास्तविक पाहता कोरोनाबाधितांमध्ये वावरताना सुरक्षेसाठी पीपीई किट घालणे गरजेचे आहे. पण महापालिका प्रशासनाने पीपीई किट उपलब्ध करून दिले नसल्याने जीव धोक्मयात घालून कर्मचाऱयांना काम करावे लागत होते.
लोकसभा पोटनिवडणुकीवेळी मनपाचे कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळे मनपाच्या 25 हून अधिक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कर्मचाऱयांच्या कुटुंबातील सदस्यांनाही बाधा झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. राज्यातील काही महापालिकांमध्ये स्वच्छता कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱया महापालिकेच्या कर्मचाऱयांना पीपीई किट उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. सध्या विविध स्मशानभूमीमध्ये कोरोनाबाधितांवर अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करणार आहेत. स्मशानभूमीत नियुक्त करण्यात येणाऱया कर्मचाऱयांना पीपीई किट गरजेचे आहे. सदर किट बुधवारी महापालिका कार्यालयात दाखल झाले आहेत. स्मशानभूमीतील कर्मचाऱयांसह कोरोना नियंत्रणासाठी कार्यरत राहणाऱया कर्मचाऱयांना सुरक्षेसाठी पीपीई किट देण्यात येणार आहे.