प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिका कार्यालयातील काही अधिकाऱयांबाबत तक्रारी झाल्याने बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यांची त्याच ठिकाणी पुन्हा वर्णी लागल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मनपाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही. एस. हिरेमठ यांची चिक्कमंगळूर येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागात बदली झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोनवाळ गल्ली मनपा कार्यालय उत्तर उपविभागातील काही तक्रारींचे निवारण करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे साहाय्यक कार्यकारी अभियंते बाहुबली चौगुला यांची बदली करून त्यांच्याकडील कार्यभार साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, याला चौगुला यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करून बदली रद्द करण्याची सूचना महापालिका आयुक्तांना केली असल्याचे समजते. त्यामुळे बदली रद्दचा आदेश तयार करून आयुक्तांकडे सहीसाठी देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर विभाग एकच्या साहाय्यक कार्यकारी अभियंतापदी चौगुला हेच राहणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोनवाळ गल्ली मनपा कार्यालय उत्तर उपविभाग 1 चे साहाय्यक कार्यकारी अभियंते बाहुबली चौगुला यांच्याबद्दल तक्रारी झाल्याने त्यांच्यापदी साहाय्यक कार्यकारी अभियंते व्ही. एस. हिरेमठ यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. पण व्ही. एस. हिरेमठ यांची चिक्कमंगळूर येथे ग्रामीण पाणीपुरवठा विभागात झाली आहे. व्ही. एस. हिरेमठ यांच्याकडे महापालिकेच्या वाहन देखभाल विभागाचा तसेच आश्रय योजना विभागाचा आणि पथदीप देखभाल विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यांची बदली झाल्याने सोमवारी त्यांना महापालिकेतून पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडील जबाबदाऱया साहाय्यक कार्यकारी अभियंते सचिन कांबळे व अन्य एका अभियंत्यांकडे सोपविण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.