सांगली : प्रतिनिधी
सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील तब्बल ८४ हजार लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोय करण्यात आली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
अधिक माहिती देताना ते म्हणाले, महापालिकेच्या दहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर बूस्टर डोस देण्याची व्यवस्था केली आहे. दोन्ही डोस घेऊन ९ महिने पूर्ण झालेले जेष्ठ नागरिक, अनेक व्याधी असलेले नागरिक तसेच दुसरा डोस घेतलेल्या फ्रंटलाईन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. जवळपास ८४ हजार लाभार्थ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.