आयुक्त नितीन कापडणीस : ५३८३४ लाभार्थी ; ४९४ बुथ
सांगली/प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात रविवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० ते सायं. ५.०० या वेळेत पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. मनपा क्षेत्रातील ४९४ बुथ वर लसीकरणाची सोय केली आहे. ० ते ५ वयोगटातील एकूण ५३ हजार ८३४ लाभार्थी आहेत.
घरभेटी कार्यक्रमासाठी २२० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोल नाके, सर्व जकात नाक्यावर ७३ फिरत्या पथकांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. याचबरोबर धार्मिक स्थळे, मंगल कार्यालये, खाजगी रुग्णालये, विट भट्टी कामगार तळ व ऊस तोड कामगार तळ इ. ठिकाणी लाभार्थ्यांना पोलिआ डोस देणसाठी २० मोबाईल टिम करण्यात आल्या आहेत. रात्र पाळीच्या २ टिम तयार करण्यात आलेल्या असुन रात्रीच्या वेळी बेघर लोकांच्या (जे रस्त्यावर दुकानाच्या पायऱ्यांवर सार्वजनिक ठिकाणी मुक्कमाला असतात.) अशा ठिकाणी मुलांना पोलिओ लसीकरण या टिम मार्फत करण्यात येणार आहे. एकूण ४९४ बुथमध्ये एक लस देयक (केंद्र प्रमुख), एक लेखनीक, एक मदतनिस अशा दोन कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. लाभार्थी बोलविण्याकरीता प्रत्येक बुथवर आशा स्वयंसेविका व इतर स्थानिक, सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक यांची मदत घेण्यात आली आहे, असेही कापडनीस यांनी यावेळी बोलताना सांगितले.