बेळगाव / प्रतिनिधी
शहरात विविध डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरवासीयांना आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे रोगराई रोखण्यासाठी डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने नविन फॉगिंग मशीन घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नव्या फॉगिंग मशिनचे प्रात्यक्षिक सोमवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी पाहिले.
महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध अत्याधुनिक यंत्रोपकरणे दाखल झाली आहेत. शहराची व्याप्ती वाढत चालल्याने हातपंपाने डास प्रतिबंधक औषध फवारणी करणे अशक्मय आहे. त्यामुळे औषध फवारणी करण्यासाठी महापालिकेने फॉगिंग मशीन घेतल्या होत्या पण त्या खराब झाल्या असल्याने नवीन फॉगिंग मशीन घेण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता एका कंपनीने सोमवारी फॉगिंग मशीनचे प्रात्यक्षिक दाखविले. 5 लिटर औषध भरण्याची क्षमता असलेले नव्या यंत्राची पाहणी करण्यात आली. महापालिका आयुक्त के. एच. जगदीश, प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण सहाय्यक अभियंते आदिलखान पठाण आदींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.