प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलतर्फे महानगरपालिका संचालित जुने बेळगाव येथील निवारा केंद्राला अंदाजे 45 हजार रुपयांचे जीवनावश्यक साहित्य देण्यात आले.
जुने बेळगाव येथील निवारा केंद्राला देण्यात आलेल्या जीवनावश्यक साहित्यामध्ये तांदूळ, डाळ, खाद्यतेल आदी जिन्नसांचा समावेश आहे. याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच. उपस्थित होते. त्यांनी या बहुमोल देणगीबद्दल रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रलचे आभार मानले. याप्रसंगी रो. अजय हेडा, अभिनंदन, मंजुनाथ, दीपक व आशिष उपस्थित होते. रोटरी क्लब सातत्याने समाजाला मदतीचा हात देत असून, गरजूंपर्यंत क्लबतर्फे मदत पोहोचवली जात आहे.