मतदार याद्या प्रिटींगचे काम सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने कोरोना प्रतिबंधक कामात सरकारी यंत्रणा गुंतली आहे. मात्र अशा स्थितीतही महापालिका वॉर्डनिहाय मतदारयाद्या तयार करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने महापालिकेला बजावला आहे. त्यामुळे मतदारयाद्या तयार करण्यात येत आहेत. मात्र काही महसूल निरीक्षक व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने मतदारयाद्या तयार करण्याचे काम रखडले आहे.
महापालिका वॉर्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदारयाद्या तयार करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला बजावला आहे. लोकसभा पोटनिवडणुकीचे काम संपताच कोरोनाचा प्रसार झाल्याने उपाययोजना राबविण्यात मनपा प्रशासन व्यस्त आहे. राज्यासह शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून निवडणुकीवेळी काम केलेल्या मनपातील काही कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच काही कर्मचाऱयांच्या कुटुंबांतील सदस्यांनाही बाधा झाली आहे. त्यामुळे अशा स्थितीत वॉर्डनिहाय मतदारयाद्या कशी तयार करायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
14 दिवसांत मतदारयाद्या तयार करून तात्कालिक याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने बजावला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्यावतीने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून कोरोनामुळे मतदारयाद्या तयार करण्यास विलंब होण्याची शक्मयता असल्याने अवधी देण्याची विनंती केली होती. पण याबाबत प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायतींची मुदत संपत आली असून नव्याने वॉर्ड पुनर्रचना करून मतदारयाद्या तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. पण कोरोनाचा प्रभाव वाढल्याने मतदारयाद्या तयार करण्यासाठी प्रारंभी दि. 15 मे पर्यंत मुदत देण्यात आली होती. पण क्लोजडाऊन आणि लॉकडाऊनमुळे पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली आहे. मात्र महापालिका मतदारयाद्या तयार करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱयांनी दिली.
2018 मध्ये वॉर्ड पुनर्रचना करताना तयार केलेल्या मतदारयाद्यांच्या आधारे नवीन मतदारयाद्या तयार करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली होती. त्यामुळे 2018 च्या मतदारयाद्यांच्या आधारे वॉर्डच्या चेकबंदीनुसार मतदारयादी तयार करण्याचे काम मनपा महसूल विभागातील अधिकाऱयांनी सुरू केले आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून घरोघरी जावून मतदारयादी तयार करणे अशक्मय आहे. मात्र घरोघरी जावून मतदारांची चाचपणी करण्याऐवजी कार्यालयात बसून मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारयाद्यांबाबत गोंधळ निर्माण होण्याची शक्मयता आहे.
काही वॉर्डच्या मतदारयाद्या तयार झाल्या आहेत. मात्र मनपातील काही महसूल अधिकाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याने काही वॉर्डच्या याद्या तयार करण्याचे काम रखडले आहे. सध्या तात्कालिक यादी प्रसिद्ध करण्याची मुदत ओलांडली आहे. पण सध्या तयार झालेल्या मतदारयाद्या प्रिटींगसाठी देण्यात आल्या आहेत. प्रलंबित वॉर्डच्या मतदारयाद्या तयार करून लवकरच तात्कालिक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तसेच याबाबत आक्षेप घेण्याची तयारी महापालिकेने चालविली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.