संपर्कात आलेल्या अधिकाऱयांसह कर्मचाऱयांमध्ये धास्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र याच दरम्यान महापालिका मुख्य कार्यालयात महसूल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाली आहे. सदर कर्मचारी कार्यालयात कार्यरत असतानाच अहवाल पॉझिटीव्ह आल्याने महसुल विभागाला टाळे ठोकण्यात आले आहे. तसेच महापालिका आयुक्तांसह महसुल विभागातील कर्मचारी कोरोनाग्रस्त कर्मचाऱयाच्या संपर्कात आल्याने सर्वांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
पर राज्यातील नागरिकांना क्वॉरंटाईन करण्याचा नियम शिथील करण्यात आल्याने महापालिका कर्मचाऱयांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. त्यानंतर महापालिका कार्यालयात कोरोनाबाधीत होण्याची संख्या देखील कमी झाली होती. त्यामुळे महापालिका कार्यालयातील कार्यालयिन कामकाज सुरळीत सुरू झाले होते. पण कार्यालयात येणाऱया नागरिकांना मास्क लावण्याची व सॅनिटायझर लावण्याची सूचना करून सुरक्षित अंतर ठेवण्यात येत होते. तरी देखील महसुल विभागातील कर्मचाऱयाला कोरोनाची लागन झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर कर्मचाऱयावर विविध कामाचा कार्यभार सोपविण्यात आल्याने महापालिका आयुक्त, महसूल उपायुक्त, महसुल अधिकारी आणि महसुल निरीक्षकांच्या संपर्कात होते. विविध फाईलवर सही घेण्यासाठी महसूल उपायुक्त आणि महापालिका आयुक्तांची सोमवारी भेट घेतली होती. पण मंगळवारी सकाळी त्रास जाणवल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना चाचणी केली असता पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे. त्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मंगळवारी दुपारी अहवाल आल्यानंतर महसूल विभागाला टाळे ठोकण्यात आले. सदर विभागाचे कामकाज दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर कर्मचाऱयाच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱयांसह कर्मचाऱयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.