अनेक लाभार्थी योजनांपासून राहणार वंचित
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेच्यावतीने राखीव अनुदानातून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजनांमध्ये कोरोनाचा अडथळा निर्माण झाला आहे. मागील वषीचा राखीव निधी अन्य कामांसाठी वळविण्यात आला. यंदादेखील अद्याप कोणत्याच योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आला नाही. त्यामुळे यावषीदेखील राखीव अनुदानातून लाभार्थींना योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेला शासनाकडून विविध अनुदान मंजूर करण्यात येते. एसएफसी अनुदानातून मिळणाऱया निधीतील काही अनुदान राखीव ठेवण्यात येते. मागासवर्गीयांसाठी 25.10 टक्के, 7.25 टक्के आणि दिव्यांगांसाठी 5 टक्के अनुदान राखीव ठेवण्यात येते. या अनुदानातून शहरातील गरजूंसाठी विविध योजना राबविण्यात येतात. गॅस संपर्क योजना, लॅपटॉप, स्वयंरोजगार योजना, प्रशिक्षण तसेच डेनेज जोडणी, आरोग्य चिकित्सा अशा विविध प्रकारचे लाभ गरजूंना अनुदानातून उपलब्ध करून देण्यात येतात. महापालिकेच्या वॉर्ड बजेट अनुदानातून या योजनाकरिता निधी राखीव ठेवला जातो. मात्र, मागील वर्षापासून योजनांसाठी निधी उपलब्ध झाला नाही. मागीलवषी कोरोना विषाणूंचा प्रसार झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेला राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदान मिळाले नाही. सदर अनुदान अन्य कामासाठी वळविण्यात आले.
शासनाकडून कोणतेच अनुदान मंजूर नाही
लॉकडाऊनमुळे शासनाकडे निधी उपलब्ध झाला नाही. कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना राबविण्याकरिता मोठय़ा प्रमाणात खर्च करण्यात आला. महापालिकेचे उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे मागीलवषी योजना राबविण्यासाठी राखीव अनुदान मंजूर झाले नाही. पण यंदाही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रारंभी क्लोजडाऊननंतर आता लॉकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी महापालिकेला शासनाकडून कोणतेच अनुदान मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे योजना राबविण्यासाठी निधी मंजूर झाला नसल्याने यंदाही गरजूंना राखीव अनुदानातून योजनांचा लाभ मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहे.