महाव्दार रोड सांस्कृतिक कमिटी संजय कडोलकर भव्य नृत्य स्पर्धांची बुधवारी जल्लोषात सांगता झाली. या स्पर्धेत स्पर्धकांनी एकापेक्षा एक असे सरस सादरीकरण करून रंगत आणली. स्पर्धकांच्या कलांना बेळगावकर रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत 150 हून अधिक स्पर्धकांनी कलाविष्काराचे दर्शन घडविले. भरतनाटय़म्, सोलो डान्स, डय़ुएट, गुप डान्स, फॅन्सी डेस अशा सात गटात झालेल्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
विविध गटातील विजेते : भरतनाटय़मः् प्रथम धन्या शेट्टी, व्दितीय समीक्षा कारंथ, तृतीय खुषी पांगी, सोलो गटात प्रथम निकिता कलागरी, व्दितीय कन्या नाईक, तृतीय प्रियराज कोगरी, स्वरा मोरे, सोलो डान्स लहान गटात प्रथम राहुल गौन, द्वितीय मंजुळा कलगेरी, तृतीय मोहन खोत, किट्टी जामदार, युगल गटात प्रथम समर्थ पृथ्वीराज, व्दितीय रक्षतम आवटी, तृतीय रीतिका आणि भूमी, गुप डान्स गटात प्रथम सेस्ट्रिक्स गुप, व्दितीय एंजल गुप, तृतीय कला काटवा हे विजयी ठरले.
धर्मवीर संभाजी उद्यानात झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना 2 लाख 51 हजार 111 रूपयांच्या बक्षिसांची खैरात करण्यात आली. यंदाचे हे या स्पर्धेचे पाचवे वर्ष असून स्पर्धकांबरोबर नृत्यप्रेमींचा प्रतिसाद वाढला. या वेळी बेळगावसह कोल्हापूर, गोवा राज्यातील स्पर्धकांचा मोठा सहभाग होता. सामाजिक कार्यकर्ते व मुख्य आयोजक संजय कडोलकर यांच्या संकल्पनेतून या खुल्या भव्य नृत्य स्पर्धा उत्साहात होत असून दरवषी स्थानिकांबरोबर परराज्यातील स्पर्धकांनी बेळगावकर रसिक मनावर छाप पाडली. या नृत्य स्पर्धेमध्ये जुन्या नवीन हिंदी, मराठी, कन्नड चित्रपटांच्या गीतांबरोबर भरतनाटय़म्ला दाद मिळाली. या वषीच्या मोसमात अंध विद्यार्थ्यांनी नृत्यरूपाने सादर केलेली कला विशेष कौतुकास्पद ठरली.
विविध नृत्यकलेबरोबर वेशभूषा स्पर्धेत स्पर्धकांनी सावित्रीबाई फुले, जिजाऊ, शिवाजी महाराज, औरंगजेब, अफझल खान, झाशीची राणी आदी भूमिका वठविल्या. महाव्दार सांस्कृतिक कमिटीतर्फे शहरात नृत्यस्पर्धेबरोबर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. शहरातील नृत्य कलाकारांना वाव मिळावा त्यांच्या कलांना व्यासपीठ मिळावे, या हेतूने नृत्य स्पर्धा भरविल्या जात आहेत. या स्पर्धेमुळे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबर बालकलाकारांना प्रोत्साहन मिळत असल्याचे संजय कडोलकर यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी मुख्य स्पर्धा आयोजक संजय कडोलकर यांच्यासह रोहित पोरवाल, किरण जाधव, अमर सरदेसाई, राजू कडोलकर, यल्लोजी पाटील, चंदन कुंदन्नावर, शिवाप्पा इटगी, अनंत पाटील, मल्लेश चौगुले, दीपिका अग्रवाल, अंजली चंदगडकर, कांचन नाईक, राजू बेळ्ळन्नकर, महांतेश हावळ, प्रवीण चंदगडकर, सुनील ताशिलदार, वैभव बिल्लारे, संतोष पेडणेकर, मोहन नाईक, विठ्ठल गोरल, मंजू कल्लर, विठ्ठल पाटील, युवराज पाटील, दीपक जाधव, नागेश पाटील, श्यामसुंदर पत्तार, सुरेखा यलजी, शीतल आजगावकर, सचिन चंदगडकर, सचिन भातकांडे आदींचे सहकार्य लाभले.
सुनील राजगोळकर