मुंबई / ऑनलाईन टीम
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आता मुंब्रा रेतीबंदर जिथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला होता तिथेच अजून एक मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
या मृतदेहाची ओळख पटली आहे. शेख सलीम अब्दुल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. ४८ वर्षीय शेख अब्दुल सलीम मजूर असून मुंब्रा, रेतींबदर येथे वास्तव्यास होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.