मुंबई / प्रतिनिधी
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज बीकेसीवर जाहीर सत्कार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेली वचनपूर्ती उद्धव ठाकरे पूर्ण करत असल्याने हा नागरी सत्कार करण्यात येईल.
23 जानेवारी हा दिवस हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून याचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा गोरेगाव येथे महाअधिवेशन आयोजन केले आहे. तर बीकेसी येथे शिवसेनेने वचनपूर्ती सत्कार सोहाळा घेतला आहे. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांचे सत्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून मोठय़ा संख्येने शिवसैनिक या सोहळय़ास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली.