मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष विवेक केळुसकर यांचा पुढाकार
ओटवणे / प्रतिनिधी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विलवडे आणि ओटवणे गावातील ४५ पूरग्रस्त कुटुंबांना गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले. मनसेचे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष तसेच वसई विरार महानगरपालिका मनसे सचिव तथा श्री माऊली प्रतिष्ठान ट्रस्टचे संस्थापक विवेक केळुसकर यांच्या या माध्यमातून या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी विवेक केळुसकर यांनी पूरग्रस्तांच्या नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर पूरग्रस्तांच्या घरोघरी जाऊन या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी कोरोनामुळे मृत्युमुखी पावलेल्या कुटुंबालाही मदत करण्यात आली. यावेळी पूरग्रस्तांनी विवेक केळूसकर यांचे आभार मानले.
यावेळी मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, मळेवाड विभाग अध्यक्ष मंदार नाईक, इन्सुली शाखाध्यक्ष सुरेंद्र कोठावळे, मळगाव शाखा अध्यक्ष राकेश परब, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, श्री वसकर, सिद्धांत बांदेकर, निलेश वाळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.