ओटवणे / प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून ओटवणे रवळनाथ वाचनालयात
आयोजित करण्यात आलेल्या संपूर्ण शारीरिक तपासणी अॅक्यूप्रेशर व फिजिओ थेरपी तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त रविंद्र कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या शिबिरात अक्यूप्रेशर, रुग्णांची शुगर तपासणी, रक्तदाब तपासणी, इ. सी. जी सह अन्य तपासण्या करण्यात आल्या.