पत्रकार दिनी मनसेच्या शिष्टमंडळाचे प्रांताधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / कणकवली:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात अनेक बँकांचे अधिकारी व काही संस्थांचे अधिकारी हे परप्रांतीय असून त्यांना मराठी बोलता येत नाही. ते हिंदी भाषेचा वापर करतात. काहीवेळा ग्रामीण जनतेला हिंदी समजत नाही. त्यांना मराठी शिकविण्यास आम्ही तयार आहोत. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी व आपल्या माध्यमातून अधिकाऱयांना कळविण्यात यावे. मनसेमार्फत मराठीचे धडे शिकवण्याचा उपक्रम आम्ही आजच्या पत्रकार दिनी जाहीर करत असल्याचे मनसेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बाळशास्त्राr जांभेकर यांचा जन्मदिवस व त्यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले तो दिवस म्हणजे 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. बाळशास्त्राr जांभेकरांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने ऋण व्यक्त करत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr, तालुकाध्यक्ष दत्ताराम बीडवाडकर, शांताराम सादये, शरद सावंत, अनिकेत तर्फे, राज पटेल मिराशी, मनोज सातोसे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा असावी व महाराष्ट्र राज्यात अधिकारी व कर्मचाऱयांनी मराठी भाषेचा वापर करून मराठीत पत्र व्यवहार आणि मराठीत संभाषण करावे. अधिकारी आणि कर्मचाऱयांना मराठी येणे सक्तीचे आहे. असे शासन परिपत्रक, शासननिर्णय केलेले असून मराठी भाषा ही महाराष्ट्राची अभिजात भाषा असावी, असा ठरावही महाराष्ट्र शासनाने केंद्रसरकारला पाठवला आहे.
त्यामुळे ज्या अधिकारी, कर्मचाऱयांना मराठी येत नाही त्यांनी आम्ही पुढील महिनाभरात मराठी शिकवण्यास तयार आहोत. याबाबत जिल्हय़ातील अग्रगण्य बँकेला आपण व जिल्हाधिकाऱयांच्या माध्यमातून कळविण्यात यावे. अन्यथा मराठी न येणाऱया बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱयांची जिल्हय़ाबाहेरच्या मोठय़ा शहरात बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.