वृत्त संस्था/ होस्टन (अमेरिका)
विश्व टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या मनिका बात्राचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. या स्पर्धेत तिने मिश्र तसेच महिलांच्या दुहेरीत तसेच मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या हेरीमोटो आणि हेयाता या जोडीने भारताच्या मनिका बात्रा आणि जी. साथियन यांचा 3-1 अशा गेम्स्मध्ये (11-5, 11-2, 7-11, 11-9) असा पराभव केला.
महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्झमबर्गच्या सारा न्युटे आणि नि लियान यांनी भारताच्या मनिका बात्रा व अर्चना कामत यांचा 11-1, 11-6, 11-8 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. या दोन्ही पराभवासह मनिका बात्राने भारतीय टेबल टेनिसमध्ये नवा इतिहास नोंदविण्याची संधी गमावली.