नवी दिल्ली
1 हजार कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग रॅकेटमध्ये सामील चिनी नागरिक आणि कंपन्यांच्या विरोधात भारतात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे चीन बिथरला आहे. मुखवटा (शेल) कंपन्यांचा वापर करत मनी लॉन्ड्रिंग करण्यात येत होते अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिली आहे. काही चिनी नागरिक आणि त्यांचे भारतीय सहकारी अनेक शेल कंपन्यांद्वारे मनी लॉन्ड्रिंग करत असल्याची माहिती मिळाली होती. काही बँक अधिकाऱयांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आल्याचे सीबीडीटीकडून सांगण्यात आले आहे. चिनी कंपन्या आंतरराष्ट्रीय नियम आणि स्थानिक कायद्यांच्या आधारावर काम करतात. चिनी कंपन्यांच्या योग्य वातावरण भारताने उपलब्ध करावे असे चीनने म्हटले आहे.