अंतिम सीझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार
लोकप्रिय वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’च्या पाचव्या आणि अखेरच्या सीझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याचबरोबर नेटफ्लिक्सच्या या सीरिजचा एक टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. भारतासह जगभरातील प्रेक्षक या सीरिजच्या पाचव्या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
मनी हाइस्ट-5 चा अखेरचा सीझन दोन भागांमध्ये याच वर्षी येणार आहे. दोन्ही भाग प्रत्येकी 5 एपिसोडचे असतील. सीझन-5 चा पहिला भाग 3 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग 3 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सीझनमध्ये पुन्हा एकदा अल्वारो मोर्टे मास्टर माइंड प्राध्यापकाच्या रुपात भेटीला येणार आहे. याचबरोबर उर्सुला कोरबेरो, इत्जियार इटुनो, मिगुएल हेरान, जैमे लोरेंटे, एस्तेर एसेबो, डार्को पेरिक आणि एनरिक एर्स देखील सीझन 5 साठी परतले आहेत.