वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शनिवारी येथे झालेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत हरियाणाची महिला नेमबाज मनु भाकरने सलग दुसऱयांदा महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात विजेतेपद मिळविले आहे.
मनु भाकरने अलिकडच्या कालावधीत तीनवेळा एअर पिस्तुल नेमबाजीत राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले आहे. महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत मनु भाकरने 241.6 गुणांसह सुवर्णपदक तर इशा सिंगने 215.4 गुणांसह कास्यपदक तर तामीळनाडू श्रीनिविताने रौप्यपदक पटकाविले.