सांखळी /प्रतिनिधी
रिवॉल्युशनरी गोवन्स चे सर्वेसर्वा मनोज परब यांनी आज साखळी नगरपालिकेच्या बाजारातील फुलविपेत्यांना घेवून साखळी नगरपालिकेत धडक दिली.
या फुलविपेत्यांची गेली कित्येक वर्षांपासून मागणी आहे की नगरपालिकेच्या बाजारपेठ व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी कुणालाच फुल विक्री करायला परवाने देऊ नये. त्यामुळे लोक बाजारात न येता बाहेरच्या बाहेर खरेदी करून निघून जातात आणि आमच्या व्यवसायावर परीणाम होतो. 2012 सालपासून नगरपालिके कडे याची मागणी ते करत आहेत.
मनोज परब यांनी आज ह्या फुलविपेत्यांना घेऊन साखळी नगरपालिकेत दाखल झाले तेव्हा तिथे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक कोणीच तिथे हजर नसल्याने त्यांना इनवर्ड करून परतावे लागले
मनोज परब यांनी यावेळी जर दिलेल्या वेळेत हा प्रश्न निकाली लागला नाही तर मोर्चा घेऊन येण्याचा ईशारा देण्यात आला आहे