प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर भोसले यांच्यासह तिघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. यात एका महिलेनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसात गुरुवारी (ता. 9) गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती करमाळा पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी दिली आहे.
मनोहर भोसले यांच्यासह तीघांविरुद्ध बारामती येथे पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर आता पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर भोसले यांच्यावर आरोप करत आदमापूर ग्रामपंचायतीने निषेधाचा ठराव केला होता. त्यानंतर उंदरगाव येथील ग्रामपंचायतीनेही आदमापूर ग्रामपंचायतीला मठाच्या बांधकामाबद्दल उत्तर दिले होते. भोसलेविरुद्ध करमाळा पोलिसातही फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पिडीतेनी तक्रार केली होती. त्यानंतर तत्काळ भोसलेसह तिघांवर 385, 376 (2)n, 376 d, 354 व अंधश्रद्धा निरमुलन कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर 0 क्रमांकाने करमाळा पोलिसात दाखल झाले आहेत.