वृत्तसंस्था/ गुवाहाटी
गुवाहाटी चहा लिलाव केंद्राने (जीटीएसी) कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात एका लिलावादरम्यान चहा पत्तीला उच्चांकी दर मिळाल्याची नोंद करण्यात आली आल्याची माहिती दिली आहे. विशेष ओळख असणाऱया मनोहारी गोल्ड चहाला प्रती किलोसाठी 75 हजार रुपये इतका भाव मिळाला आहे.
चालू वर्षामधील आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांकी किमत चहापत्तीला मिळाली आहे. हा नवीन विक्रम असल्याचेही गुवाहाटी चहा लिलाव खरेदी संघटनेचे सचिव दिनेश बिहानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदरची चहा खरेदी ही कंटेपरी ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि गुवाहाटीमधील चहा व्यापारी विष्णू टी कंपनी यांनी खरेदी केल्याची माहिती आहे.
विष्णू टी कंपनीने आपल्या डिजिटल ई वाणिज्य वेबसाइट नाइनएएमटी डॉट कॉमच्या माध्यमातून हा चहा जगभरात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जात असल्याचेही स्पष्ट केले आहे.