कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पुतण्या आणि खासदार अभिषेक बॅनर्जीविरोधात ईडीने समन्स जारी केले आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पत्नी रुजिरा बॅनर्जी हिलाही समन्स बजावले आहे. दोघांनाही 3 सप्टेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोळसा घोटाळय़ाशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या समन्सवर ममता बॅनर्जी यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. टीएमसीच्या विरोधात भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोळशाच्या भ्रष्टाचारासाठी तृणमूलकडे बोट दाखवून काही उपयोग नाही, असे सांगत हे प्रकरण केंद्राच्या अंतर्गत असल्याचे स्पष्ट केले.