ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का बसला आहे. ममतांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार देबाश्री रॉय यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. दक्षिण 24 परगण्यातील रेडिगी मतदारसंघातील त्या आमदार होत्या. पक्षाध्यक्ष सुब्रतो बक्षी यांच्याकडे रॉय यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
तृणमूलमधून बाहेर पडल्यानंतर आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करू, असे संकेत रॉय दिले आहेत.