नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा झटका देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी भाजपला आता आणखी एक झटका दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांनी आज ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या संदर्भात स्वत: मुकुल रॉय यांनी माहिती दिली आहे. तसेच ममता बॅनर्जी यांनी पक्ष प्रवेशानंतर मुकुल रॉय आणि त्यांचे चिरंजीव शुभ्रांशु रॉय यांचे पक्षात स्वागत केले.
तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांनी, मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या बंगालमध्ये जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीत भाजपामध्ये कुणीही राहू शकत नाही. असं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
मुकुल रॉय हे टीएमसी सोडणारे सर्वात पहिले नेता होते. पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत तृणमूल काँग्रेसने त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. टीएमसीमध्ये असताना मुकुल रॉय हे ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपात प्रवेश केला होता.