बहुचर्चित कोळसा घोटाळाप्रकरणी होणार तपास
कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना कोळसा घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने दुसऱयांदा नोटीस बजावली आहे. अभिषेक बॅनर्जींबरोबरच त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांचीही चौकशी करणार ईडीकडून केली जाण्याची शक्यता आहे. दोघांना पुढील आठवडय़ात तपास अधिकाऱयांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी मागील वषी 10 सप्टेंबर रोजी या दोघांना समन्स बजावण्यात आले होते. बॅनर्जी पती-पत्नीला वेगवेगळय़ा दिवशी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश नोटिशीमधून देण्यात आले आहेत. नोटिशीमध्ये नमूद पेलेल्या तारखांनुसार 21 मार्चला अभिषेक बॅनर्जी आणि त्यानंतर 22 मार्चला रुजिरा बॅनर्जी यांची चौकशी केली जाणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 11 मार्च रोजी त्यांना ईडीसमोर हजर राहण्यासाठी बजावलेल्या समन्सला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली होती. आम्ही पश्चिम बंगालचे रहिवासी असल्याने आम्हाला दिल्लीत हजर राहण्यासाठी समन्स जारी करू नये, असे निर्देश ईडीला देण्यात यावेत असा बचाव याचिकेत करण्यात आला होता.