ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या अधिकारक्षेत्रात वाढ, त्रिपुरा हिंसाचार आणि राज्यातील विकासाशी संबंधित मुद्यांवर चर्चा होईल. सायंकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे.
ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. हिवाळी अधिवेशनापूर्वीचा ममतांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो. त्या काँग्रेसच्या बडय़ा नेत्यांना तसेच इतर विरोधी नेत्यांना भेटू शकतात, अशी चर्चा आहे. दरम्यान, संयुक्त जनता दलाच्या राज्यसभेचे माजी खासदार पवन वर्मा, काँग्रेस नेते कीर्ती आझाद आणि अशोक तंवर यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.