ओनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालमधील तीन आणि ओडिशामधील पिपली या एका मतदारसंघात गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शांततेत मतदान झाले. ममता बॅनर्जींचे होमग्राऊंड अशी ओळख असलेल्या भवानीपूरमध्ये केवळ 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाल्याने निकालाची उत्सुकता वाढली आहे. भवानीपूरमध्ये 60 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. याउलट प. बंगालमधील अन्य दोन मतदारसंघांपैकी मुर्शिदाबाद जिल्हय़ातील समसेरगंज मतदारसंघात 78.60 आणि जंगिपूर मतदारसंघात 76.12 टक्के इतके मतदान झाले आहे. तसेच ओडिशामधील एका जागेसाठी पिपली मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत 68.40 इतके मतदान झाले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee Chief Minister of West Bengal) या कायम राहणार की नाही याबाबत आज होणार आहे.
पश्चिम बंगालच्या महत्त्वाच्या अशा भवानीपूर (bhawanipur) विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (west bengal bypoll) ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आज येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरु केली आहे. मात्र भोवानीपूर येथील कमी मतदानानंतर तृणमूलच्या नेत्यांनी रविवारी मतमोजणीच्या काही तास आधी ममता बॅनर्जी पोटनिवडणुकीत ५० हजार मतांनी जिंकतील असे म्हटले आहे. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने त्या निवडणून येतील असे तृणमूलने म्हटले आहे.